नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधित

नांदेड :  नांदेड शहर आणि जिल्ह्यातील शुक्रवारी 553 कोरोना बाधित आढळले आहेत. त्यात महापालिका क्षेत्रातील 312 रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी 2 हजार 288 संशयित नागरिकांची चाचणी करण्यात आली. 128 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  (A record-breaking corona was found in the Nanded district on Friday)

 

 

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 658 अहवालापैकी 553 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 475 तर अँटिजेन तपासणीद्वारे 78 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 92 हजार 742 एवढी झाली असून यातील 88 हजार 226 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 861 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (A record-breaking corona was found in the Nanded district on Friday)

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 290, नांदेड ग्रामीण 31, अर्धापूर 7, भोकर 5, देगलूर 1, धर्माबाद 3, हदगाव 5, हिमायतनगर 1, कंधार 19, किनवट 25, लोहा 12, माहूर 2, मुदखेड 1, मुखेड 16, नायगांव 4, उमरी 2, अमरावती 7, औरंगाबाद 1, पुणे 3, हिंगोली 9, परभणी 20, नागपूर 1, वर्धा 1, वाशिम 3, यवतमाळ 1, कोल्हापूर 1, निजामाबाद 2, पंजाब 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 22, नांदेड ग्रामीण 4, भोकर 2, बिलोली 7, देगलूर 3, धर्माबाद 7, कंधार 33, किनवट 10, लोहा 1, माहूर 2, मुदखेड 2, मुखेड 9, नायगाव 6 असे एकूण 553 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 106, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 10, खाजगी रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.(A record-breaking corona was found in the Nanded district on Friday)

 

आज 1 हजार 861 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 389, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 432, खाजगी रुग्णालय 18 अशा एकुण 1 हजार 861 व्यक्ती उपचार घेत आहेत.

Local ad 1