पुण्यात गणेशोत्सव मंडळे आणि प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत काय ठरलं?

 

पुणे : पोलिस आणि मनपा प्रशासनाने गणेशोत्सवाच्या संदर्भात केलेल्या नियमांचे पालन हे सर्वच मंडळांनी केले पाहीजे. आम्हाला पण ध्वनी प्रदुषण नको आहे, ढोल-ताशा (Dhol Tasha) पथकासंदर्भातील नियमावलीचे पालन कले जात नाही, पोलिस प्रशासनाने सर्वांनाच समान न्याय द्यावा, अशी अपेक्षा गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पुणे महापालिकेच्यावतीने (PMC) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर गणेश मंडळ, स्वंयसेवी संस्था, पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात कार्यकर्त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. विशेष म्हणजे या बैठकीला शहराच्या विविध भागातील रहीवासी संघाचे प्रतिनिधी, पर्यावरण प्रेमी संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरीक, डॉक्टर उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Pune Municipal Commissioner Dr. Rajendra Bhosale), अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (Additional Commissioner Prithviraj B.P.), विशेष शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव, परिमंडळ एकचे उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. (A meeting of Ganeshotsav boards and administration was held in Pune)

 

 

 

बैठकीत ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी, विविध निमित्ताने वर्षभर निघणाऱ्या मिरवणुकांमुळे नागरीकांना होणारा त्रास, रुग्णवाहीकांना न मिळणारी वाट आदी विषयांवर तक्रारी त्यांच्याकडून मांडल्या गेल्या. तसेच ढोल ताशा पथकांच्या सरावामुळे दोन महीने आवाज सहन करावे लागत असल्याच्या तक्रारी यावेळी मांडल्या गेल्या. सरावाचे दिवस, ठिकाण आदीबाबत नियमावली तयार करावी अशी मागणी केली गेली. मंडळांचे प्रतिनिधीत्व करणारे संदीप काळे, गणेश घोष यांनी गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांना वेगळ्या नजरेतून बघितले जात असल्याची चिंता व्यक्त केली. गणेश मंडळे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवितात, गरजुंना मदत करतात, वाहतुक कोडी सोडविण्यासाठी पुढे येत असतात, त्यांच्या या कामाचे कौतुक केले पाहीजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सुर्यवंशी यांनी हा गणेशोत्सव पाहण्यासाठी सगळीकडून लोक येतात, याचाच अर्थ असा आहे, की आपला गणेशोत्सव चांगला आहे असे नमूद केले. ध्वनी प्रदुषण आम्हाला नको आहे, ज्या प्रमाणे वाहनांची गती मर्यादीत करण्यासाठी स्पीड लॉक वापरले जाते, तसेच आवाजाची मर्यादा लॉक करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

 

 

 

 

 

पर्यावरण, डॉक्टर, व इतरांच्या सूचना

ढोल‌ताशाची संख्या कमी करा, कमी ढोल असले तरी योग्य वादन केल्यानंतर आवाज चांगला‌ येतो. उत्सवाच्या कार्यकर्त्यांचे व मंडळांचे थोडे प्रबोधन करणे गरजेचे आहे. उत्साहाच्या नावावर धांगडधिंगाणा सुरू आहे. डिजे आणि लेजर लाईटचा तरुणन पिढीच्या अवयवांवर परिणाम होत आहे. ढोल ताशांचे‌ सराव दोन महिन्यांपासून सुरू आहेत. तक्रार करूनही काहीच दखल घेतली जात नाही. किती दिवस आधी सराव सुरू करावा हे निश्चित करावे. उत्सव व जयंत्यांचा त्रास आमच्या जिवनावर होत आहे. रुग्णवाहिकांना रस्ता मिळत नाही. रुग्णवाहिकेला सायरन असते, मात्र उपचारासाठी जाणारे डॉक्टर, नर्स यांना पोहचता येत नाही. रुग्ण पोहचतो, पण त्यावर उपचार देणारे पोहचत नाहीत. दवाखान्याच्या आसपासच्या मंडळांना कसल्याची आवाजाला परवानगी देऊ नये. जयंती व उत्सवानंतर हार्ट व रक्तदाबाचे रुग्ण वाढतात. एका परिसरात चार चार मंडळांना परवानगी देऊ नये. सायलेंट झोनमध्ये पोलिस मंडळांना परवानगी देतात. गणपतीसमोर अश्लिल गाणी लावतात. संस्कृतिला लाजवणारी गाणी का लावली जातात. लेजर व डेजेला परवानगी देऊ नये,एक किंवा दोनच स्पिकर ला परवानगी द्यावी. कर्णकर्कश आवाजामुळे हृदय रोग आणि रक्तदाबाचे रुग्ण वाढतात. सायलेंट झोनमध्ये मंडळांना परवानगी देऊ नये, अशी सूचना केली आहे.

 

 

 

 

 

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सूचना

संभाजी उद्यानाच्या समोरील मेट्रोच्या पादचारी पुलाची उंची कमी म्हणजे १७ फूटाचा आहे, रथाची उंची कमी करावी, महापालिकेने मंडळांना आर्थिक अनुदान द्यावे. पथकाची‌ संख्या ठरते, मात्र ती पाळली जात नाही. दिशादर्शक फलक लावावे. पार्किंगची व्यवस्था करावी. सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवावी, मोबाईल टॉयलेट उपलब्ध करावेत. परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवावी. महवितरणने घरगुती दराने वीज बील, आकारणी करावी. ढोल ताशा पथक, ध्वनी क्षेपक आदी नियमांबाबत समान न्याय ठेवा, अशी सूचना केल्या आहेत.

 

 

 

 

 

‘‘ध्वनीप्रदुषणाच्या बाबतीत मंडळांनी नियम पाळावेत, ध्वनी प्रदुषणाच्या‌ तक्रारीसाठी नंबर जारी केला जाईल. मंडळाच्या उत्पन्नासाठी जाहीरातीसाठी धोरण आणू, पूर्वीचे सर्व निर्णय कायम राहतील. कमानीमुळे रस्त्याची रुंदी‌ कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी, फूटपाथ व रस्त्यावर अतिक्रमणे काढली‌ जातील. वाहतुक, सीसीटिव्ही, तात्काळ प्रतिसाद टिम, मेट्रोसंदर्भातील सुचना योग्य‌ असुन, त्यावर कार्यवाही केली जाईल. पथकांनी ढोल ताशाच्या‌ सरावासाठी नो रेसिडन्स झोन शोधावा. मूर्ती विक्री परवानगी लवकर दिली जाईल’’

डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे मनपा.

 

Local ad 1