...

भामट्यांचा भांडाफोड : नोकरी आदेश पत्राच्या भाषेवरून ‘बोगस’ भरती चव्हाट्यावर

पुणे : शासकीय नोकरी (Government job) कोणाला नको असते. ती मिळविण्यासाठी विद्यार्थी पुण्यातील सदाशिव पेठेत (Sadashiv Peth)  किंवा ते शहरात वास्तव्याला आहेत, त्याठिकाणी रांत्र-दिवस अभ्यास करतात. एकदाची सरकारी नोकरी लागली की, त्यांना त्याठिकाणी उपयोगात येणारी व लिहिली जाणारी भाषा अवगत करावी लागते. एखादे पत्र किंवा आदेश समोर आला की, त्यातील मजकुरावरून पत्र किंवा आदेश खरं की खोट हे ओळखता आलं पाहिजे.नाही तर मोठा घोटाळा होण्याची शक्यता असते. (A case has been registered against him for bringing fake appointment order)

 

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत अधिपरिचारिका आणि इतर पद हे कंत्राटी पद्धतीन भरले जाते. विशेष म्हणजे याठिकाणी एकही पद हे कायमस्वरुपी नसते. मात्र,पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर  परिचारक पदाचे नियमिती करण्याचे आदेश घेऊन रुजू होण्यासाठी सहा जण पोहोचले. परंतु आदेशावरील मजकूर हे शासकीय भाषेत नव्हते. त्यामुळे काही तरी घोटाळा झाल्याचा संशय डाॅक्टरांना आला. त्यामुळे तुम्हांला रुजू होण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जावं लागेल, असे सांगितले. मात्र, संबंधित व्यक्ती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे गेलेच नाहीत. त्यामुळे अजून शंकेला वाव मिळाले. (A case has been registered against him for bringing fake appointment order)

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत परिचारिका (Staff Nurse) या पदाची 11 महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावरील पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यांची मुदत 4 फेब्रुवारी 2022 संपुष्टात आली. त्यानंतर कोणत्याही प्रकारची पद भरती करण्यात आलेली नाही. (A case has been registered against him for bringing fake appointment order)

 

स्कॅन स्वाक्षरीचा वापर

जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.भगवान पवार यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिपरिचारिका (Staff Nurse)  पदाचे नियमितीकरणाचे आदेश जारी केले आहेत का याची विचारणा संबंधित डॉक्टरांनी केली. आपण आशा प्रकारचे कोणतेही आदेश दिले नाहीत, असे स्पष्ट केले. त्यामुळे आदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे त्या आदेशावर डाॅ. भगवान पवार यांची स्कॅन केलेली स्वाक्षरी (Scanned signature) वापरण्यात आली आहे. (A case has been registered against him for bringing fake appointment order)

 

 

गुन्हे दाखल

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिपरिचारिकांसह कोणत्याही पदांसाठी नियमित नियुक्ती केली जात नाही. 11 महिन्यांचे करार असते. या आर्थिक वर्षात कोणतेही करार करण्यात आलेले नाही. जिल्ह्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर बनावट आदेश घेऊन रुजू होण्यासाठी परिचारिक गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, पुढील तपास पोलिस करत आहेत, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली. (A case has been registered against him for bringing fake appointment order)

Local ad 1