...

सव्वा कोटीची अपसंपदा जमवल्याचे चौकशीत सिद्ध ; जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य नितीन ढगेसह पत्नीवर गुन्हा

ACB Case पुणे : एक लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकलेला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे (District Caste Certificate Verification Committee Member Deputy Commissioner Nitin Chandrakant Dhage) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता एसीबीने सव्वा कोटींची अपसंपदा बाळगल्या प्रकरणी नितीन ढगेसह त्याच्या पत्निवर गुन्हा दाखल केला आहे. (A case has been registered against caste certificate verification committee member Nitin Dhage along with his wife)

 

 

ज्ञात उत्पन्ना पेक्षा अधिकची 47 टक्के म्हणजे 1 कोटी 28 लाख 95 हजारांची संपत्ती बाळगल्याप्रकरणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे यांच्यासह त्याची पत्नी प्रतिभा ढगे (दोघेही रा. रहेजा गार्डन, वानवडी) याच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (A case has been registered at Wanwadi police station) करण्यात आला आहे. (A case has been registered against caste certificate verification committee member Nitin Dhage along with his wife)

 

जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्याकरीता 8 लाखांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1 लाख 90 हजारांची लाच स्विकारल्या प्रकरणातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य नितीन ढगे याला ऑक्टोंबर 2021 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली होती. यानंतर त्याच्या घर झडतीमध्ये तब्बल 1 कोटी 28 लाख 49 हजारांचे घबाड सापडले होते. या सापळ्यानंतर करण्यात आलेल्या चौकशी अंती ढगे याच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा 1 कोटी 28 लाख 95 हजारांची जास्त संपत्ती बाळगल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

ही संपत्ती भ्रष्ट मार्गाने कमविल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. तर त्याच्या पत्नी प्रतिभा ढगे हिने साथ दिल्याने तसेच खोटी माहिती कागदपत्रामध्ये भरून शासनाची फसवणूक केल्याचे दाखल गुन्ह्यात म्हटले आहे. ही कारवाई एसीबीेचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (ACB Superintendent of Police Amol Tambe), अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे (Additional Superintendent of Police Sheetal Janve), उपअधीक्षक नितीन जाधव (Deputy Superintendent Nitin Jadhav), उपअधीक्षक सुदाम पाचोरकर (Deputy Superintendent Sudam Pachorkar) यांनी केली.

 

Local ad 1