(Llimca book of records) २४ तासात ३९ किमीचा रस्ता
पुणे : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान ३९.६५ किलोमीटरचा रस्ता अवघ्या २४ तासात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला. याची ‘लिम्का बुक’मध्ये (Llimca book of records)नोंद झाली आहे. एका दिवसात ३० किमीचा रस्ता तयार करण्याचा संकल्प असताना ३९.६९ किमीचा रस्ता तयार करत विक्रम स्थापित केला. (Record by constructing a 39.69 km long road in just 24 hours Llimca book of records)
साडेतीन मीटर रुंद आणि ३९.६९ किलोमीटर लांबीचा हा रस्ता (Llimca book of records)पुसेगाव, जायगाव, औंध, गोपूज, म्हासूर्णे असा होता. जवळपास ४७४ कामगार आणि २५० वाहने व मशिनरीच्या साहाय्याने हे काम पूर्ण झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, मुख्य अभियंता सदा साळुंके, श्री. मुंगळीवार, माजी अभियंता एस. पी. दराडे आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम, संचालिका मोहना कदम, अर्थ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे, सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते. (Record by constructing a 39.69 km long road in just 24 hours)
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण व सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व वरिष्ठ-कनिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्दर्शन व सहकार्य लाभले. साताराचे जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, व शासनाच्या सर्व विभागांनी चांगले सहकार्य केले. राजपथ इन्फ्राकॉनमधील माझ्या सर्व सेवक सहकार्यांनी हा विश्वविक्रम संकल्प तडीस नेण्यासाठी अहोरात्र झटून मनापासून प्रयत्न केले. हा विश्वविक्रम करतांना या सर्व मंडळीचे मन:पूर्वक योगदान राहिले आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा विश्वविक्रम पुर्णत्वास नेऊ शकलो त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो,” असे राजपथ इन्फ्राकॉनचे जगदीश कदम म्हणाले. (Llimca book of records)