जागेच्या ‘एनए’साठी “फक्त” 42 लखांची मागणी ; महिला तहसिलदारासह पाच जणांवर गुन्हा

पुणे : ट्रस्टच्या जागेचा अकृषक प्रमाणपत्र (Non-Agricultural Certificate) म्हणजेच एन ए (NA) करुन देण्यासाठी तलाठ्याने त्याच्यासाठी व वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी तब्बल 42 लाखांच्या लाचेची मागणी केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणात एसीबीने (ACB) महिला तहसीलदारासह (Tahsildar office pune) पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे पुणे जिल्हा महसूल विभागात (Pune District Revenue Department) एकच खळबळ उडाली. (42 lakhs demand for ‘NA’ of space; Crime against five people including woman tehsildar)

 

 

शिरूरच्या तत्कालीन तहसीलदार रंजणा उरहांडे (सध्या पुणे जिल्हा सहाय्यक अधिकारी) (The then Tehsildar Ranjana Urhande of Shirur) यांच्यासह शिरूर तहसील कार्यालयातील महसूल सहायक स्वाती सुभाष शिंदे (Revenue Assistant Swati Subhash Shinde), शिरूरचा तलाठी सरफराज तुराब देशमुख (Talathi Sarfraz Turab Deshmukh of Shirur)  आणि खासगी व्यक्ती अतुल घाडगे, निंबाळकर नावाच्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनएसाठी पैश्याची मागणी होत असल्याची तक्रार एका 46 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. (42 lakhs demand for ‘NA’ of space; Crime against five people including woman tehsildar)

 

 

लाचेची मागणी केल्याचे चौकशीत आले समोर

एसीबीने दिलेल्या माहती नुसार, तक्रारदार यांच्या ट्रस्टच्या जागेचा एनए (NA of trust premises) करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी तलाठी देशमुख यांच्याकडे देण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी व वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी आणण्यासाठी तलाठी देशमुख यांने स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी तब्बल 42 लाख रुपयांची मागणी केली. परंतु, तक्रारदारांना लाच इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने मे 2022 पासून एसीबीचे या प्रकरणावर लक्ष होते. या तक्रारीनुसार एसीबीने पडताळणी केली. तक्रारदार यांच्या ट्रस्टच्या जागेचा एनए प्रस्ताव मंजुर करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयातून मंजुरी आणण्यासाठील तलाठी देशमुख यांनी 42 लाखांची मागणी केल्याचे चौकशीतून समोर आले.

 

बंडगार्डन पोलिस ठाण्यात पाचही जणांवर गुन्हा

महसूल सहायक स्वाती शिंदे यांनीही 1 लाखांची मागणी करत होत्या. त्याबरोबरच जागेचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व जिल्हाधिकारी कार्यालयात मदत करण्यासाठी रंजना उमरहांडे यांनी पाच लाखांची मागणी केली. तर खासगी व्यक्ती अतुल घाडगे आणि निंबाळकर  (पूर्ण नाव) यांनी ह्या प्रस्तावाची जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरी मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी 20 लाख रूपयांची मागणी केली. तसेच गुन्हा दाखल केलेल्या सर्व आरोपींनी लाच मागणीस सहाय्य करून प्रोत्साहन दिल्याने एसीबीने केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला. त्यानंतर आता  बंडगार्डन पोलिस ठाण्यात पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (42 lakhs demand for ‘NA’ of space; Crime against five people including woman tehsildar)

 

Local ad 1