Waqf Board। वक्फ बोर्डाच्या उद्देशालाच दिली जातेय बगल : माजी केंद्रीय मंत्री के रहमान खान
Waqf Board । राज्य वक्फ बोर्डांची कामगिरी निराशाजनक असून, हे मुस्लिम समाजासाठी चिंतेचे कारण बनले आहे. ज्या उद्देशासाठी बोर्डाची स्थापन करण्यात आली. त्यालाच बाजुला सारलं जात आहे, अशी खंत माजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री के. रहमान खान यांनी (Former Union Minister K Rahman Khan) शनिवारी पुण्यात व्यक्त केली. (Waqf Board’s purpose is being ignored: Former Union Minister K Rahman Khan)
पुणे येथील कॅम्प परिसरातील आझम कॅम्पस येथे अंडरस्टैंडिंग ट्रू नेचर एंड मैनेजमेंट ऑफ औकाफ फॉर बेटर प्रोटेक्शन, परफॉरमेंस एंड डेवलपमेंट’ या दोन दिवसीय राष्ट्रीय वक्फ परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून खान बोलत होते. (Waqf Board’s purpose is being ignored: Former Union Minister K Rahman Khan)
वक्फ जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून, ते अतिक्रमण काढण्याचे अधिकार वक्फ बोर्डाला आहेत. परंतु वक्फ बोर्ड आपल्या अधिकाराचा वापरत करत असल्याचे दिसून येत नाही. मुतवल्लींसह (काळजी घेणार्या) मंडळाचे सदस्य आपापसातील भांडणात वेळ घालवत आहेत. परिमाणी त्यामुळे मंडळाच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने मंडळाचे कमकुवत झाले आहे, असे खान म्हणाले.
समाजाच्या सक्षमीकरणासाठी विद्यापीठ, महाविद्यालये, रुग्णालये, शाळा, कौशल्य विकास केंद्रे, दवाखाने यांच्या विकासाला चालना देण्याची गरज आहे, असे मत इन्कम टॅक्सचे माजी मुख्य आयुक्त अकरमुल जब्बार खान यांनी व्यक्त केले. (Waqf Board’s purpose is being ignored: Former Union Minister K Rahman Khan)
मुस्लीम समाजाच्या पायाभूत काम आणि इच्छेच्या अभावामुळे हजारो एकर वक्फ जमीन गिळकृत करण्यात आली आहे. जोपर्यंत मुस्लिम समुदाय मोठ्यासंख्येने बाहेर पडत नाही, तोपर्यंत वक्फ जमीन मुक्तीचा मार्ग मोकळा होणार नाही. विकासाच्या माध्यमातून देशातील मुस्लिमांच्या जीवनात परिवर्तनीय बदल घडवून आणू शकतात आणि राष्ट्राचा विकास करू शकतात. समाजाची दुर्दशा दूर करण्यासाठी वक्फ जमिनीचा व्यावसायिक विकास करणे ही काळाची गरज असल्याचे मत अकरमुल जब्बार खान यांनी व्यक्त केले.
आयओएसचे सरचिटणीस प्रो झ.म. खान म्हणाले, वक्फचे लोकशाहीकरण इस्लामने केले आहे आणि जगात इतर कोणीही केले नाही. भारतीय मुस्लिमांना जमिनीवरील वास्तवाची जाणीव होत आहे आणि बदलत्या काळानुसार ते जागे झाले आहेत. ते झपाट्याने शहरीकरण स्वीकारत असून, स्त्रिया आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर माता बालशिक्षणासाठी अशी मोठी पावले उचलत असतील तर एक मोठा बदल घडू शकतो. ज्यामुळे देशाचा विकास होण्यास मदत होणार आहे.
एमडब्ल्यूएलपीटीचे अध्यक्ष सलीम मुल्ला म्हणाले, वक्फबाबत जनजागृती करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी वक्फ मालमत्तेचा वापर करण्याबाबत विचारमंथन करण्यासाठी दोन दिवसीय राष्ट्रीय वक्फ परिषदेसाठी भारतातील विविध क्षेत्रातील सुमारे 40 विचारवंत पुण्यात जमले आहेत, ते पुढे म्हणाले. (Waqf Board’s purpose is being ignored : Former Union Minister K Rahman Khan)