FIFA World Cup 2022 : इंग्लंडची इराणवर 6-2 च्या फरकाने मात
इंग्लंड संघाने इराणला 6-2 अशा मोठ्या फरकाने मात दिली
Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) इंग्लंड विरुद्ध इराण (England vs Iran) सामना झाला. यामध्ये इंग्लंड संघाने इराणला 6-2 अशा मोठ्या फरकाने मात दिली. इंग्लंडच्या बी. साका याने सर्वाधिक दोन गोल केले. तर इराण संघाकडून मेहदी तरेमी यानेच दोन गोल केले. (FIFA World Cup 2022 England beat Iran by 6-2)
An impressive #ENG display 👏@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 21, 2022
दरम्यान सामना इंग्लंडने जिंकल्याने हेड टू हेड रेकॉर्डमध्ये इंग्लंड 1-0 ने आघाडीवर पोहोचला आहे. सामन्याचा विचार करता इंग्लंड संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. 35 व्या मिनिटाला जुड बेलिंगहमने गोल करत संघाचं खातं उघडलं. त्यानंतर 43 व्या मिनिटाला साकाने गोल केला तर रहीम स्टर्लिंगने हाल्फ टाईम नंतर मिळालेल्या एक्स्ट्रा वेळेत गोल केल्यामुळे हाल्फ टाईमपूर्वी 3-0 ची मोठी आघाडी घेतली. (FIFA World Cup 2022 England beat Iran by 6-2)