Bharat Jodo Yatra । शेगाव येथे राहुल गांधी यांची सभा : काळे झेंडे दाखवण्याचा मनसेचा इशारा

Bharat Jodo Yatra । काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) 72 वा दिवस असून, महाराष्ट्रातील यात्रेचा 12 वा दिवस आहे.  सकाळी सहा वाजता अकोल्यातील कुपट बाळापूर येथून पदयात्रेला सुरूवात झाली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी देखील आज राहुल गांधी यांच्या भारत जोडे यात्रेत सहभागी झाले आहेत. शेगाव इथे गजानन महाजारांचे दर्शन घेतल्यानंतर साडेसहा वाजता राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे. (Bharat Jodo Yatra. Rahul Gandhi’s meeting at Shegaon)

 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्याठिकाणी काय होते, हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातले वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपसह मनसे आणि शिंदे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सभेसाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे जेष्ठ नेते मुकुल वासनिक, भाई जगताप, नसीम खान, सुनील केदार, मिलिंद देवरा, दिपेंद्र सिंग गुड्डा यांच्याससह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. (Bharat Jodo Yatra. Rahul Gandhi’s meeting at Shegaon)

 

आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊ !

आम्हांला काळे झेंडे दाखवत असतील तर आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊ असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनसेच्या विरोधाची हवा काढण्याचा प्रयत्न केला. मनसेने कितीही विरोध केला तरीही यात्रा रोखता येणार नाही, हे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यात्रा कोणीही थांबू शकणार नाही. मनसे हा एक स्टंटबाज पक्ष आहे. आज मनसेच्या वतीने शेगावच्या सभेमध्ये काळे दाखवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर भाई जगताप बोलत होते. (Bharat Jodo Yatra. Rahul Gandhi’s meeting at Shegaon)

Local ad 1