एजंटमार्फत दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणारी अलिबागची तहसीलदार मीनल दळवी ACB च्या जाळ्यात

अलिबाग : बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्याचे आदेश देणे आणि बक्षीस पत्रावर घेतलेल्या अक्षेपात मदत करण्यासाठी एजंटमार्फत दोन लाख रुपये स्विवकरणाऱ्या अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी (Alibag Tehsildar Meenal Dalvi) यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा वाजता करण्यात आली. (Alibag Tehsildar Meenal Dalvi in ​​ACB trap)

 

 

तक्रारदार यांच्या सासऱ्याच्या आईने सासऱ्यांना बक्षीस पत्राद्वारे दिलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्याचे आदेश द्यावे तसेच ससऱ्याच्या भावानी बक्षीस पत्रावर हरकत अपिलाचा निर्णय सासऱ्याच्या बाजूने देण्यासाठी अलिबागच्या तहसीलदार मीनल कृष्णा दळवी (वय 49) (Alibag Tehsildar Meenal Dalvi) यांनी एजंट राकेश रमाकांत चव्हाण यांच्यामार्फत पाच लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. (Alibag Tehsildar Meenal Dalvi in ​​ACB trap)

 

 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आलेल्या तक्रारीची पडताळणी 29 सप्टेंबर रोजी केली.  त्यामध्ये एजंट राकेश चव्हाणने दळवी यांच्यासाठी दोन लाख रुपये तर स्वतःसाठी एक लाख रुपये असे एकूण एक लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. (Alibag Tehsildar Meenal Dalvi in ​​ACB trap)

 

शुक्रवारी एजंट राकेश चव्हाणने अलिबाग नगरपालिका इमारतीच्या समोरील आर के इलेक्ट्रॉनिक्स दुकानात तहसीलदार मीनल दळवी यांच्यासाठी दोन लाख रुपये स्विकारले. ही कारवाई सायंकाळी पावणे सहा वाजता करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार मीनल दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. (Alibag Tehsildar Meenal Dalvi in ​​ACB trap)

 

 

 

अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे (Superintendent of Police Sunil Lokhande) उपाधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. (Alibag Tehsildar Meenal Dalvi in ​​ACB trap)

Local ad 1