Rahul Gandhi : ”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली. त्या दिवशी रात्री आठ वाजता येऊन ते म्हणाले, बंधू आणि भगिनींनो मी 500 आणि हजारांचे नोट आजपासून रद्द करत आहे. काळा पैशाविरोधात मी लढाई लढत आहे. काही दिवसानंतर ते म्हणाले, जर काळा पैसा बंद नाही झाला तर मला फासावर द्या. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू करून सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे असा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर हल्ला चढवला आहे. (Rahul Gandhi attacks Prime Minister Narendra Modi’s policies)
भारुड यात्रेनिमित्त नांदेड येथील नवा मोंढा मैदानावर आयोजित सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबई काँग्रेसचे नेते नसीम खान, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेस आणि इतर सामाजिक संघटनाचे अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. (Rahul Gandhi attacks Prime Minister Narendra Modi’s policies)
राहुल गांधी म्हणाले, आम्ही रोज सात-आठ तास चालतो. शेतकऱ्यांना, मजुरांना, तरुणांना भेटतो. तुमचं म्हणणं ऐकतो. तुमचं दुःख समजतो. मी एकटाच नाही तर सगळेच काँग्रेसचे नेते. आम्ही त्याच रस्त्यावर चालत आहे. ज्यावर तुम्ही चालतो. आज सकाळी मला दोन लहान मुले भेटले. दोघे भाऊ होते. मी त्यांना विचारलं काय करता, तुम्हाला काय बनायचं आहे. त्यातला एक मुलगा म्हणाला , शिकतोय. मला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचं आहे. त्याला विचारलं, शाळेत जातो. तो म्हणाला हो जातो. मी त्याला विचारलं तू कधी कॉम्प्युटर पाहिला आहे. तो म्हणाला नाही. मला वाईट वाटलं. मी त्याला विचारलं तुझ्या शाळेत कॉम्प्युटर नाही का? तो म्हणाला नाही. काही नाही आहे कॉम्प्युटर शाळेत? कारण भारतातील सर्व धन दोन-तीन उद्योगपतींच्या हातात चालले आहे. म्हणून शाळेत कॉम्प्युटर नाही, अशी टीका राहुल यांनी केली आहे. (Rahul Gandhi attacks Prime Minister Narendra Modi’s policies)
राहुल गांधी म्हणाले, ”नोटबंदी केली. चुकीची जीएसटी पद्धत लागू केली. पाच वेगवेगळे कर लागू करण्यात आले. तेही 28 टक्के. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर कर लादण्यात आला आहे. खतांवर कर. त्यांच्या अवजारांवर कर. जीएसटी आणून प्रत्येक गोष्टीवर कर लावून समस्या वाढवल्या आहेत.”’लोक म्हणतात 3500 किमी चालत आहेत. याला काही अर्थ नाही. तुम्ही असा विचार नका करू की, हे कठीण काम आहे. हे कठीण नाही तर सोपं काम आहे. तुम्ही यात्रेत सहभागी झालेल्या लोकांना विचारू शकता. हे सोपं का आहे, तर यात आम्ही नाही चालत आहे. तुमचं प्रेम आम्हाला पुढे चालण्याची ऊर्जा देतो. सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही चालत आहे. आठ वाजले अजूनही थकलो नाही,असे ते म्हणाले.