Shivsena News : शिवसेना (ShivSena ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जामीन मिळाल्यानंतर आज मातोश्रीवर
जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर (BJP) टीका केली. राज्यात शिवसेनेत गट नाही तर एकच शिवसेना आहे, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट बोलले. (MP Sanjay Raut’s big statement on ShivSena,)
संजय राऊत माझा जीवलग मित्र आहे. तो शिवसेनेसाठी लढला आणि लढतो आहे. आता त्याला जामीन मिळाला आहे. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. विरोधक आताही शांत बसणार नाही.’ संजय राऊत यांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा अटकवले जाऊ शकते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. (MP Sanjay Raut’s big statement on ShivSena,)
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणावर निशाणा साधला. संजय राऊत हा शिवसेना नेता आहे, खासदार आहे, सामनाचा कार्यकारी संपादक आहे आणि माझा जिवलग मित्र आहे. मित्र तोच असतो, जो संकटाच्या काळात न डगमगता लढतो. संकटासोबत राहून संजय लढतोय. काल न्यायालयाच्या निकालामुळे सगळं स्पष्ट झालं आहे. मी न्यायदेवतेचे आभार मानतो. या निकालात न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागतायत हे स्पष्ट आहे. बेकायदेशीरपणे केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरु अशी टीका ठाकरे यांनी केली. (MP Sanjay Raut’s big statement on ShivSena,)