महसूल विभागत मोठी खळबळ : साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला अटक

नांदेड :  खरेदी केलेल्या शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील  इतरांचे नाव काढून तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तलाठ्याने चार हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर साडेतीन हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच (bribe) लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. या कारवाईमुळे महासोली विभागात एकच खळबळ उडाली आहे. (Talathi who accepted a bribe of three and a half thousand rupees was arrested)

नायगाव सज्जाचा तलाठी बालाजी सिताराम राठोड याने फिर्यादीकडे सातबारा उताऱ्यावरील इतरांची नावे कमी करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती साडेतीन हजार रुपयांची लाच घेण्याची तयारी दर्शवलली. परंतु तक्रारदार यांना लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा करून सापळा लावण्यात आला. फिर्यादी कडून साडेतीन हजार रुपये स्वीकारताना राठोड याला रंगेहात पकडण्यात आले. (Talathi who accepted a bribe of three and a half thousand rupees was arrested)

*यशस्वी सापळा कार्यवाही*

➡ *युनिट       :-* नांदेड
➡ *तक्रारदार  :-* पुरुष, वय – 35 वर्षे
➡ *आरोपी  :-*
बालाजी सिताराम राठोड,वय 44 वर्ष, पद -तलाठी, तलाठी सज्जा नायगाव, ता. नायगाव, जि.नांदेड, रा. कृष्ण वाडी तांडा ता. मुखेड, जि.नांदेड.
➡ *तक्रार प्राप्त:-*
      दि.07/11/2022
➡ *लाच मागणी पडताळणी:-*
      दि.07/11/2022
➡ *लाच स्विकारली :-*
       दि.07/11/2022
➡ *लाचेची मागणी रक्कम:-*  रु.4,000/-
➡ *स्विकारली रक्कम :-*  तडजोडी अंती रु.3,500/-
➡ *थोडक्यात हकिकत
              तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीचे सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील  इतरांचे नाव काढून तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 4000/-रुपयाची मागणी करून तडजोडीअंती 3500/- रुपये लाच स्विकारली.
➡  मार्गदर्शक
डॉ राजकुमार शिंदे
पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड.
 धरमसिंग चव्हाण
अपर पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि.नांदेड, परिक्षेत्र नांदेड.
➡ पर्यवेक्षण अधिकारी:-
 राजेंद्र पाटील
पोलीस उप अधीक्षक,
ला.प्र.वि. नांदेड.
➡ सापळा अधिकारी
 गजानन बोडके
पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि. नांदेड
➡ सापळा कारवाई पथक
 पोलीस निरीक्षक ढवळे, सपोउपनि संतोष शेट्टे, पोना राजेश राठोड,  पोशि ईश्वर जाधव,  पोशि यशवंत दाभनवाड, चापोना प्रकाश मामुलवार  ला. प्र. वि. युनिट नांदेड
➡ तपास अधिकारी
गगजानन बोडके
पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि. नांदेड

नांदेड  जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. (Talathi who accepted a bribe of three and a half thousand rupees was arrested)

 

 

डॉ राजकुमार शिंदे, पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र,नांदेड
मोबाईल क्रमांक 9623999944
राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड

मोबाईल क्रमांक – 7350197197

कार्यालय दुरध्वनी – 02262-253512*

@ टोल फ्रि क्रं. 1064
Local ad 1