(Take precautions for the treatment of corona patients : ) कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खबरदारी घ्या : अशोक चव्हाण

 नांदेड  :  गेल्या दोन आठवड्यापासून महानगरासमवेत जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या काळजी करण्यासारखी आहे. हा प्रार्दुभाव अधिक वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणाना दक्ष रहावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनाला दिले आहेत. (Take precautions for the treatment of corona patients : Ashok Chavan)

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे घेतली. त्यावेळी ते बोलत होते. (Take precautions for the treatment of corona patients : Ashok Chavan)

जे कोरोना बाधित गृहविलगिकरणात आहेत त्यांनी बाहेर पडून इतरांच्या आरोग्याला  बाधा होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवून काळजी घेण्यासाठी शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. ज्या परिसरात  कोरोना बाधिताची संख्या अधिक प्रमाणात आढळून आली आहे. अशा परिसराचे सुक्ष्म नियोजन करुन तेथे आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती बैठकीत ठेवण्यात आली. (Take precautions for the treatment of corona patients : Ashok Chavan)

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे,  जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे,  मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने,  अतिरिक्त जिल्हाधिकारी  डॉ. खुशालसिंह परदेशी,  अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन तसेच विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. (Take precautions for the treatment of corona patients : Ashok Chavan)     

जिल्ह्यात यापुर्वी कोरोना उपचारासाठी प्रत्येक तालुकानिहाय जी यंत्रणा उभी केली होती त्यात आरोग्याच्यादृष्टिने अत्यावश्यक उपचाराच्या सुविधा व स्वच्छतेच्या बाबतीत कोणतेही दुर्लक्ष चालणार नाही असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करून प्रशासकीय यंत्रणाना निर्देश दिले. (Take precautions for the treatment of corona patients : Ashok Chavan)

जिल्ह्यातील विविध शासकीय शैक्षणिक संस्थाच्या इमारती कोविड सेंटरसाठी तयार ठेवण्याच्या दृष्टीने त्याची पाहणी करून तेथे सर्व प्रकारच्या प्राथमिक स्वरुपाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन ठेवाव्यात. आरोग्याबाबतच्या सोयी सुविधा सामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणानी अधिक दक्ष असावे असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. (Take precautions for the treatment of corona patients : Ashok Chavan)

Take precautions for the treatment of corona patients : Ashok Chavan
Take precautions for the treatment of corona patients : Ashok Chavan

जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभाच्यावतीने  सुक्ष्म नियोजन झाले आहे.  कोरोना बधितांना ऑक्सीजन व औषधी कमी पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (Take precautions for the treatment of corona patients : Ashok Chavan)

Local ad 1