नोंदणीकृत कामगारांच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण !
कामगार मंत्री सुरेश खाडे यांची बैठकीनंतर दिली माहिती
labor department maharashtra News : राज्यातील कामगारांच्या घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत (Pradhan Mantri Gharkul Yojana) नोंदणीकृत कामगारांना घरकुल दिले जाणार आहे, अशी माहिती कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे (Labor Minister Dr.Suresh Khade) यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात (Aurangabad Collector’s Office) आढावा बैठकीत ते बोलत होते. (The dream of registered workers’ homes will come true !)
प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्याच्या निर्णयासोबतच खाडे यांनी आणखीन एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुर्वी कामगार नोंदणी करण्यासाठी 25 रुपये नोंदणी फी होती. ही फी कमी करुन आता केवळ 1 रुपयांमध्ये कामगार नोंदणी केली जाणार आहे. (The dream of registered workers’ homes will come true)
ई-श्रम नोंदणी काळाची गरज असून, प्रत्येक जिल्ह्याने नोंदणी कालबद्ध रीतीने पूर्ण करावी. नोंदणी वाढविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करावे, अतिधोकादायक कारखाने व धोकादायक कारखान्यांचे निरिक्षण वेळेच्या वेळी पूर्ण करण्याचे निर्देश खाडे यांनी दिले आहेत. (The dream of registered workers’ homes will come true !)