नांदेडच्या अपर जिल्हाधिकारीपदी पांडुरंग बोरगावकर

राज्यातील 34 अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

नांदेड : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असे सांगितले जाते होते. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सनदी अधिकारी (आयएएस आणि आयपीएस) यांच्या बदल्या झाल्या आहेत आता राज्यातील 34 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Transfers of 34 Additional Collectors in the state)

 

 

 

 

आता राज्यातील 34 अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात उप जिल्हाधिकारी निवडश्रेणीतील 19 जणांची अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अपर जिल्हाधिकारी संवर्गातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर अपर जिल्हाधिकारी संवर्गातील आठ अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. (Transfers of 34 Additional Collectors in the state)

 

नांदेडचे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची हिंगोली येथे बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागी पाडुंरंग शंकरराव कांबळे बोरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Transfers of 34 Additional Collectors in the state)

Local ad 1