धीर सोडून नका, सरकराला मदत देण्यास भाग पाडू : उद्धव ठाकरे

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांचे पद गेल्यानंतर हा पहिलाच मराठवाडा (Marathwada) दौरा असून, अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतीचे नुकसान झाले आहे. थेट बांधावर जात त्याची पहाणी केली. धीर सोडून नका, सरकराला आर्थिक मदत द्यायला भाग पाडू, अशा शब्दांत ठाकरे यांनी शेतकर्‍यांना (farmers) धीर दिला.  (Don’t lose patience, we will force the government to give help : Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकर्‍यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी जाणून घेतली. तर शेतकर्‍यांनी देखील आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.    (Don’t lose patience, we will force the government to give help : Uddhav Thackeray)

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गंगापूर तालुक्यातील दहेगाव आणि पेंढापूर या गावातील नुकसानग्रस्त भागातील उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी शेतकर्‍यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सोबतच आम्ही सर्व तुमच्या सोबत असल्याचे सुद्धा सांगितले. तर शेतकर्‍यांची दिवाळी गोड करा, नोटिसा थांबवा, अशी कैफियत शेतकर्‍यानी उद्धव ठाकरेंसमोर मांडली.   (Don’t lose patience, we will force the government to give help : Uddhav Thackeray)

Local ad 1