T20 World Cup 2022। मेलबर्नमध्ये आज होणार भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना

T20 World Cup 2022 । भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात रविवारी (23 ऑक्टोबर 2022) सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उस्तुकता आहे. परंतु, मेलबर्नमध्ये (Melbourne) सतत पडणाऱ्या पावसाने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. (T20 World Cup 2022 India-Pakistan cricket match)

 

मेलबर्नच्या ताज्या अपडेट (latest update news) नुसार, मेलबर्नमधील वातावरणात बदल पाहायला मिळत असून भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे. (T20 World Cup 2022 India-Pakistan cricket match)

 

मेलबर्नमधील ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, रविवारीपर्यंत हवामानात बदल होणार नाही, असा अंदाज लावला जात होता. परंतु, आता मेलबर्न येथील वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथील पावसाची शक्यता कमी आहे. ज्या ठिकाणी पहिल्या दिवशी 80 टक्क्यांपर्यतं पाऊस पडण्याची शक्यता होती, ती आता 25 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. (T20 World Cup 2022 India-Pakistan cricket match)

संभाव्य संघ

भारत : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

पाकिस्तान : बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.

Local ad 1