धर्माबाद तालुक्यात अजगराने शेळी केली फस्त ; सर्प मित्राने केली ‘ही’ कामगिरी

नांदेड : जंगलात फिरताना साप दिसल्यास माणूस भीतीने घामाघाम होतो. पंरतु धर्माबाद तालुक्यातील चोंडी ( Chondi in Dharmabad Taluk)  येथील शेतकऱ्याला शेळीला गिळंकृत केलेला भला मोठा अजगर दिसला. त्यावेळे शेकऱ्याने न घाबरता सर्पमित्राला बोललं. त्या सर्प मित्रांने त्या अजगराच्या सुखरूप जंगलात सोडून दिलं. (In Dharmabad taluka, a python killed a goat)

 

 

 

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद (Dharmabad in Nanded District) तालुक्यातील चोंडी या गावाच्या शिवारातील ही घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ (Video) समोर आला आहे. मिळालेल्या  माहितीनुसार ज्ञानेश्वर घंटेवाड हा शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी चोंडी गावाच्या शिवारात गेला होता. त्यांच्या शेळ्यांच्या कळपावर जंगलात असलेल्या एका भल्या मोठ्या अजगराने झडप घातली. अजगराच्या झडपेत कळपातील एक शेळी सापडली. शेळीवर हल्ला करत शेळीला गिळण्याचा प्रयत्न या अजगराने केला. या अजगराच्या तावडीत आपली शेळी सापडल्याचे ज्ञानेश्वरच्या लक्षात आले. (In Dharmabad taluka, a python killed a goat)

 

 

 

जंगलात झाडाझुडूपांची संख्या मोठी असल्याने अजगरासारखे प्राणी या जंगलात वास्तव्यास आहेत. दरम्यान घंटेवाड यांनी सर्पमित्राला या घटनेची माहिती दिली. सर्पमित्र घटनेच्या ठिकाणी पोहचेपर्यंत अजगराने संपूर्ण शेळीच गिळंकृत केली होती. सर्पमित्र क्रांती बुद्धेवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या अजगराला पकडले. या बारा फुटाच्या अजगराला सुरक्षितरित्या पकडून जंगलात नेऊन सोडण्यात आले. (In Dharmabad taluka, a python killed a goat)

 

Local ad 1