(nanded corona update today) नांदेड जिल्ह्यात 414 कोरोना बाधित रूग्णांची वाढ
नांदेड : जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 826 अहवालापैकी 414 अहवाल कोरोना पॉझिव्ह प्राप्त झाले. यात आरटीपीसीआरद्वारे 238 तर अँटिजेन तपासणीद्वारे 176 अहवाल बाधित आले आहेत. (nanded corona update today)
जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 27 हजार 371 एवढी झाली आहे. सोमवारी किनवट तालुक्यातील जुनातांडा येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 617 एवढी झाली आहे. (nanded corona update today)
सोमवारी 1 हजार 826 अहवालापैकी 1 हजार 320 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 27 हजार 371 एवढी झाली असून यातील 23 हजार 907 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 625 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 58 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. (nanded corona update today)
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 11, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 117, माहूर तालुक्यांतर्गत 10, कंधार तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 12, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 13 असे एकूण 166 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 87.34 टक्के आहे. (nanded corona update today)
बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 184, अर्धापूर तालुक्यात 2, देगलूर 6, हदगाव 3, लोहा 12, उमरी 1, परभणी 2, नांदेड ग्रामीण 6, भोकर 6, धर्माबाद 12, किनवट 2, नायगाव 1, यवतमाळ 1 असे एकूण 238 बाधित आढळले. (nanded corona update today)
आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 235, बिलोली तालुक्यात 1, हदगाव 2, किनवट 7, मुदखेड 2, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 13, देगलूर 1, कंधार 1, लोहा 2, मुखेड 10, नागपूर 1 असे एकूण 176 बाधित आढळले. (nanded corona update today)
जिल्ह्यात 2 हजार 625 बाधितांवर उपचार सुरु असून, यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 104, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 88, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 46, किनवट कोविड रुग्णालयात 47, मुखेड कोविड रुग्णालय 41, हदगाव कोविड रुग्णालय 5, लोहा कोविड रुग्णालय 24, महसूल कोविड केअर सेंटर 109, देगलूर कोविड रुग्णालय 10, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 597, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 359, खाजगी रुग्णालय 195 आहेत. (nanded corona update today)
जिल्ह्याची कोरोनाची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 51 हजार 926
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 19 हजार 807
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 27 हजार 371
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 23 हजार 907
एकुण मृत्यू संख्या-617
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 87.34 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-85
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-321
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 625