...

Pune Chandani Chowk Bridge : चांदणी चौकातील तीस वर्षे जुना पूल सहा सेकंदात होणार इतिहस जमा

पुणे : पुणे- बंगरुळू राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Bangrulu National Highway) चांदणी चौकातील (Chandni Chowk PUNE) 30 वर्षे जूना पूल केवळ सहा सेकंदात इतिहास जमा होणार (History will accumulate) आहे. आज रात्री दोन वाजल्यानंतर कोणत्याही क्षणी 600 किलो स्फोटकांनी (600 kg explosion) पूल उडवला जाणार आहे. तर सकाळी आठ वाजेपर्यंत महामार्ग बंद ठेवला जाणार असून, त्यानंतर वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. (Thirty years old bridge in Chandni Chowk will become history in six seconds)

पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात आले आहे. 600 किलो इमल्शन स्फोटकांचा (600 kg of emulsion explosives) उपयोग करण्यात येणार आहे. 1 हजार 350 डिटोनेटरचा (Detonator) उपयोग नियंत्रित पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात येणार आहे. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे करण्यात येत आहेत. रविवारी (2 ऑक्टोबर रोजी) पहाटे  सर्व तयारी वेळेवर झाल्यास पहाटे 1 ते 2 च्या दरम्यान पूल पाडण्यात येईल. (Thirty years old bridge in Chandni Chowk will become history in six seconds)

पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी 6 हजार 500 मीटर चॅनल लिंक्स, 7 हजार 500 वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, 500 वाळूच्या पिशव्या आणि 800 वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून 200 मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार आहे.(Thirty years old bridge in Chandni Chowk will become history in six seconds)

पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री

पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली जात आहे. 16 एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, 2 अग्निशमन वाहन, 3 रुग्णवाहिका, 2 पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले आहेत. (Thirty years old bridge in Chandni Chowk will become history in six seconds)

पोलिसांचा तगडी बंदोबस्त

सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण 3 पोलीस उपायुक्त, 4 सहायक आयुक्त, 19 पोलीस निरीक्षक, 46 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच 355 पोलीस कर्मचारी असे एकूण 427 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त् करण्यात आले आहेत. (Thirty years old bridge in Chandni Chowk will become history in six seconds)

Local ad 1