Zilla Parishad Elections | जिल्हा परिषद निवडणुकी विषयी महत्त्वाची अपडेट ; जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर
तुमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष कोण असणार ?
- Zilla Parishad Elections |मुंबई : ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण जाहीर झाले आहे. त्यासंदर्भात राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. (Important Update on Zilla Parishad Elections: Zilla Parishad President’s reservation announced)
राज्यातील जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीवर सध्या प्रशासक राज सुरू आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने सहा महिन्यासाठी प्रशासक नेमण्यात आले होते. परंतु या काळातही निवडणुका झाल्यामुळे पुन्हा प्रशासकाना मुदतवाढ देण्यात आली आहे. शुक्रवारी राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष (Zilla Parishad Elections) पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. या संदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, आता लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता आहे. (Important Update on Zilla Parishad Elections: Zilla Parishad President’s reservation announced)
तुमच्या जिल्ह्यातील आरक्षण जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबीवर पडल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्याने येणाऱ्या निवडणुका अटीतटीच्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक कधी लागेल याची शाश्वती नाही, त्यामुळे शांत राहणे पसंत केले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यास सर्वसामान्य मतदारांची दिवाळी आणि दसरा गोड होऊ शकतो, मानले जात आहे. (Important Update on Zilla Parishad Elections: Zilla Parishad President’s reservation announced)