नांदेड : नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 87 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. (Lumpy reached 20 villages in Nanded district)
नांदेड जिल्ह्यातील 20 गावे लम्पी बाधित आहेत. या 20 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन 10 हजार 138 एवढे असून, यातील 87 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. याचबरोबर उर्वरीत पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 138 एवढी आहे. यात 20 बाधित गावे पकडून ही संख्या 158 एवढी होते. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावामधील पशुधन संख्या ही 48 हजार 320 एवढी आहे. (Lumpy reached 20 villages in Nanded district)
बाधित व परिघातील सर्व गावांची पशुधन संख्या ही 58 हजार 458 एवढी आहे. आज लसीकरणाच्या मोहिमेत 40 हजार 5 एवढे लसीकरण झालेले आहे. उपलब्ध लसमात्रा ही 2 लाख 60 हजार एवढी आहे. एकुण प्रागतिक लसीकरण 84 हजार 968 एवढे झाले असून मृत पशुधन संख्या 2 वर आहे. गंभीर आजारी असलेल्या पशुधनाची संख्या 15 एवढी आहे. (Lumpy reached 20 villages in Nanded district)