एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात शरद पवार का म्हणाले जाणून घ्या !

पुणे : सुप्रिया राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं. पण एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात. मुलीबद्दल अंदाज कसं चुकू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणावं लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी एका जुन्या मुलाखतीमधील अंदाजावर आज भाष्य केले. (If you have only one daughter, you have to bear some stubbornness: Sharad Pawar)

 

 

डॉक्टर्स असोसिएशनचा (Doctors Association) वतीने एक मुलगी असणाऱ्या कुटुंबांचा सन्मान गणेश कला क्रीडा रंगमंच येथे करण्यात आला. (If you have only one daughter, you have to bear some stubbornness: Sharad Pawar)

 

 

या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. या कार्यक्रमाला डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर निलेश जगताप, डॉक्टर रणजीत घाडगे उपाध्यक्ष, डॉक्टर सुनील जगताप, सचिव डॉक्टर दिपाली वाघ, खजिनदार डॉक्टर अंबिका खरड, डॉक्टर निरंजन जाधव, डॉक्टर चंद्रशेखर जावळकर, डॉक्टर संभाजी मांगडे, डॉक्टर राज लवंगे उपस्थित होते.

 

52 वर्षांपूर्वी एका मुलीवर कुटुंब नियोजन केल्यावर कोणता सामना करावा लागला?
शरद पवार – ‘माझ्यावर झालेल्या संस्काराचे श्रेय माझ्या आईचे आहे. घरात कोणी शिक्षित नव्हते. आईने आम्हाला शिकवलं. त्यामुळे माझा स्त्रियांविषयी विचार करण्याची मानसिकता तेव्हा पासूनच बदलली. कुटूंब नियोजनाचा निर्णय घेतला तेव्हा मला फारसा काही सामना करावा लागला नाही. मात्र निवडणुकीच्या वेळी एकच मुलगी या प्रश्नाला सामोरं जावं लागलं. एकदा मला प्रचारावेळी विचारलं गेलं, एकच मुलगी मग अग्नी कोण देणार? म्हणजे लोकांना अग्नी कोण देणार याची काळजी. मात्र मला ती काळजी नव्हती. मुलगी सगळं करू शकते. हे तेव्हाही मी सांगितलं.

 

 

आईच्या पेशन्समुळंच संसार टिकला* – सुप्रिया सुळे
एका शब्दात वडिलांबद्दल बोलायचं तर ते खूप स्ट्राँग आहेत. पण माझ्या आईच्या पेशन्समुळंच बहुदा त्यांचा संसार इतका काळ टिकलाय. मी आईकडून पेशन्स घेतलं आहेत. (If you have only one daughter, you have to bear some stubbornness: Sharad Pawar)

 

देशातील बहुतांश भगत अद्याप ही महिलांना प्राधान्य दिलं जात नाही, काय वाटतं?
शरद पवार – उत्तर भागात अद्याप ही महिलांना म्हणाव तसं प्राधान्य दिलं जात नाही. हे लोकसभेत अनेकदा जाणवतं. अगदी स्वपक्षीयांनाही माझं म्हणणं सुरुवातीला पटलं नव्हतं. (If you have only one daughter, you have to bear some stubbornness: Sharad Pawar)

 

*विधानसभा आणि लोकसभेत महिला सदस्यांची संख्या वाढवायची असेल तर….?*
शरद पवार- मानसिकता बदलायला हवी. आम्ही म्हणजे राजकीय प्रमुख. ह्यांनी योग्य दिशा दाखवायला हवी. लोकसभा आणि विधानसभा इथं महिलांची संख्या कमी आहे. का? तर महिला निवडून येईल अशी खात्री अनेकांना वाटत नाही. निवडून आलीच तर ती महिला आपलं काम करेल का? त्यामुळे मतदारांची तीच मानसिकता आहे. विधानसभा आणि लोकसभेत महिलांची संख्या वाढवायची असेल तर यासाठी आपल्याला जनमत तयार करावं लागेल.

*इंदिरा गांधींवर काय म्हणाले शरद पवार?*
– माझे आणि इंदिरा गांधींचे बऱ्याच मुद्द्यावर वाद झाले. पण असं असलं तरी मी हे सांगू इच्छितो की, इंदिरा गांधींसारखं नेतृत्व क्वचितच पाहायला मिळतं. (If you have only one daughter, you have to bear some stubbornness: Sharad Pawar)

Local ad 1