नांदेड : जिल्ह्यात श्री गणेश उत्सव (Shri Ganesha Utsav) 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत डॉल्बी (Dolby) मालक / धारक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी (District Magistrate Khushal Singh Pardeshi)
यांनी काढला आहेत. (Shree Ganesh Utsav Dolby System usage ban)
जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) अन्वये 31 ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन ते 9 सप्टेंबर रोजी श्रीचे विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यात कोणत्याही डॉल्बी मालक / धारक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री संबंधितांनी स्वत:चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी. हा आदेश 31 ऑगस्ट 2022 रोजीच्या मध्यरात्रीपासून ते 9 सप्टेंबर रोजी 24 वाजेपर्यंत श्रीचे विसर्जन होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील. (Shree Ganesh Utsav Dolby System usage ban)
डॉल्बीचे आवाजामुळे व कंपनामुळे लहान मुले, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व सामान्य नागरीक यांच्या कानास, ऱ्हदयास आरोग्यास,जिवितास धोका होण्याची तसेच सामाजिक स्वास्थ बिघडण्यास व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांतता व सुरीक्षततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी मालक / धारक यांचेवर बंदी घालण्यात आली आहे. असेही आदेशात नमुद केले आहे. (Shree Ganesh Utsav Dolby System usage ban)