कंधारच्या तलावत पाच जणांचा बुडून मृत्यू

कंधार : नांदेड, खुदबईनगर येथून कंधार येथील बडीदर्गाहच्या (Badirgah) दर्शनासाठी आलेल्या 5 भाविकांचा जगतुंग तलावात (Jagtung Lake) बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 21) (sunday) दुपारी एकच्या सुमारास घडली. मृत एकाच कुटुंबातील आहेत. (Five people drowned in Kandahar lake)

 

मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार (वय 45) यांचा मुलगा मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन (वय 15), सय्यद सोहेल सय्यद वाहिद (वय 20), सय्यद नवीद सय्यद वाहिद (वय 25), मामा मोहम्मद विखार (वय 23 सर्व रा. खुदबईनगर नांदेड) असे मृतांची नावे आहेत. (Five people drowned in Kandahar lake)

 

 

प्राप्त माहितीनुसार, मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार हा नांदेड येथे बेकरी व्यवसाय करत होते. सर्व आपल्या नातेवाईक व कुटुंबासह कंधार येथील हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम (बडी दर्गाह) च्या दर्शनासाठी रविवारी आले होते. (Five people drowned in Kandahar lake)

 

 

सर्वांचे दर्शन झाल्यानंतर जेवण करण्यासाठी तलावाच्या काठावर गेले. जेवण झाल्यानंतर प्लेट धुण्यासाठी तलावाच्या काठावर गेले असता त्यातील एकाचा पाय घसरुन तलावात पडला. त्याला वाचवण्यासाठी एक एक करुन पाचही जण तलावात बुडू लागले. यावेळी सोबत असलेल्या महिलेने त्यांच्या इतर नातेवाईकांना दिली. माहिती कळताच स्थानिक लोकांनी तलावाकडे धाव घेत बुडत असलेल्या पाच जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तात्काळ त्यांना रुग्णवाहिका व रिक्षातून कंधार येथील ग्रामीण रुग्णालय आणले. मात्र, डॉक्टरांनी सर्वांची तपासणी करुन मृत घोषित केले.

Local ad 1