भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार नाही, असे काम करणार ; मुलीच्या मनोगताने उपस्थितांचे डोळे पाणावले !

पुणे  : “आम्हाला वडील नाहीत आणि आता आई पासूनही लांब राहून आम्ही शिक्षण घेत आहोत. आम्ही जिद्दीने शिक्षण घेऊन देशाचे जबाबदार नागरिक बनू आणि कोणत्याही शेतकऱ्यावर भविष्यात आत्महत्येची वेळ येणार नाही, असे काम करू ” असे मनोगत नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगी दुर्गा क्षीरसागर (Durga Kshirsagar, daughter of a suicide farmer) हिने व्यक्त केले. (We will work so that no farmer will have to commit suicide in future)

 

            नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या (Bhoi Pratishthan) वतीने गेल्या सहा वर्षांपासून शैक्षणिक पालकत्व प्रकल्प पुण्यजागर सुरू आहे. त्या प्रकल्पात दर्गा इयत्त सहावीमध्ये आहे. नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या सहा मुली (Six daughters of farmers who committed suicide in Nanded district) पुण्यात शिक्षणासाठी आल्या आहेत. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दुर्गा बोलत होती. (We will work so that no farmer will have to commit suicide in future)

 

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर परिसरातील बावीस मुलांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानने स्वीकारलेले आहे. शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर, जगप्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ.नरेंद्र जाधव (Dr. Raghunath Mashelkar, Dr. Jayant Narlikar, Dr.Narendra Jadhav) आदींच्या मार्गदर्शनात आणि सक्रिय सहभागात हा उपक्रम सुरू आहे. (We will work so that no farmer will have to commit suicide in future)

 

शैक्षणिक पालकत्व पुण्यजागर प्रकल्पातील सहा विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत आले आहेत. त्यांच्या आयुष्यातील या अनोख्या संधीचा शुभारंभ नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर (Former Vice Chancellor of Savitribai Phule Pune University Dr. Nitin Karmalkar). ज्येष्ठ साहित्यिक न. म .जोशी, डॉ.रवींद्र वंजारवाडकर, निवृत्त एअर मार्शल भुषण गोखले (Retired Air Marshal Bhushan Gokhale), डॉ.सुधाकर जाधवर. फुलचंद चाटे (Fulchand chate), उद्योजक दादा गुजर, सुरेश कोते यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या  शिक्षण प्रवासात पुणेकरांनी दिलेले योगदान अनमोल असून, पुण्यातील शिक्षणामुळे या मुलांचे भवितव्य उज्ज्वल असेल असा विश्वास ण्यजागर  प्रकल्पाचे संयोजक,  भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केला आहे.

सासवड जवळील वीर या गावातील अस्तित्व गुरुकुल या संस्थेत ही मुले शिकणार असून या शाळेच्या संचालिका गीता देगावकर यांनी या मुलांचे भवितव्य उज्ज्वल घडवण्यासाठी आपण सर्वजण मिळून एकत्रित प्रयत्न करू असे सांगितले.

भारतमाता अभ्यासिका, पर्वती पायथा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. प्रकल्पाचे नांदेड येथील समन्वयक लक्ष्मीकांत मुळे यांनी आभार प्रदर्शन केले.
Local ad 1