“अतिसार होता बाळराजा, ओआरएस किंवा झिंक पाजा”
अतिसाराची लक्षणे
पालकांनी घ्यावयाची काळजी
आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा
दरम्यान जे बाळ स्तनपान करीत असेल त्याला स्तनपान सुरु ठेवावे. अतिसार दरम्यान व नंतरही जास्तीत जास्त स्तनपान द्यावे. बालक अधिक आजारी असेल, स्तनपान करू शकत नसेल, शौचातून रक्त पडत असेल, पाणी कमी पीत असेल किंवा ताप येत असेल, यापैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्यसंस्थेशी, गावातील आशा कार्यकर्ती किंवा ए.एन.एम यांच्याशी संपर्क साधावा. (Diarrhea was Balraja ORS or Zinc Paja)
कार्यक्रमाची रुपरेषा
ओ.आर.एस आणि झिंक गोळ्यांचे वाटप
पावसाळ्यात सर्वांत जास्त आजार दूषित पाण्यामूळे होतात. अतिसार नियंत्रण मोहिमेकरिता लागणारे ३ लाख ७६ हजार १८४ ओआरएस व ८७ लाख १० हजार ४७० झिंक गोळ्यांच्या साठा पुणे जिल्ह्यात उपलब्ध आहे. अतिसार संसर्गाबाबत लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील अर्भक व बालमृत्यू कमी करण्यासाठी ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.– डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकार, पुणे.