माऊलींच्या अश्वांची श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना

पुणे : माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील (Palkhi ceremony of Saint Shrestha Dnyaneshwar Mauli) मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला (Dagdusheth Halwai Ganpati) अनोखी मानवंदना दिली. प्रत्यक्ष मंदिराच्या सभामंडपात अश्वांनी प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत आरोग्यसंपन्न भारताकरिता श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली. (Unique homage to the rich Dagdusheth Ganapati of Mauli’s horses)

 

पुण्यात करुणा शर्मावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

 

कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे यांसह उर्जीतसिंह शितोळे (सरकार), महादजीराजे शितोळे (सरकार), पंढरपूर देवस्थानचे गहिनीनाथ महाराज औसेकर, राजाभाऊ थोरात, मारुती महाराज कोकाटे, बाळासाहेब वांजळे, योगेश गोंधळे यांसह वारकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती. (Unique homage to the rich Dagdusheth Ganapati of Mauli’s horses)

 

आषाढी वारीसाठी पुणे विभागातून ५३० बसेस धावणार

 

शितोळे सरकार म्हणाले, माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. कोविड संकटापूर्वी सलग दोन वर्षे अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे. यंदा तिस-या वर्षी गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात. (Unique homage to the rich Dagdusheth Ganapati of Mauli’s horses)

 

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी !

 

वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदा देखील तिस-या वर्षी हे अश्व दगडूशेठ गणपती मंदिराच्या सभामंडपात आले. ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त वारीसोहळ्यातील राबविण्यात येणा-या उपक्रमांची सुरुवात चांगली झाली असून हरित वारी, स्वच्छता, आरोग्य तपासणी आणि वारक-यांकरीता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. (Unique homage to the rich Dagdusheth Ganapati of Mauli’s horses)

 

Local ad 1