आषाढी वारीसाठी पुणे विभागातून ५३० बसेस धावणार
पुणे : यंदाच्या आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने (Maharashtra State Road Transport Corporation) पुणे विभागातून ६ ते १४ जुलै या कालावधीत ५३० बसेस सोडण्यात येणार आहेत. (530 buses will run from Pune division for Ashadi Wari)
पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी !
ssc result 2022 maharashtra board : दहावीचा निकाल लागला : आता गुणपत्रिका कधी मिळणार ?
गर्भपातासाठी आता तीन दिवसात मिळणार परवानगी
सासवडला पालखीचा मुक्काम असतो. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे पालखी सोहळा न झाल्याने यावर्षी अधिक संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने सासवड ते पुणे प्रवासासाठी १५० बसेस भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. गेल्या वारीस ११० बसेस सेवेत होत्या. यंदा त्यामध्ये ४० बसेस वाढविण्यात आल्या आहेत. (530 buses will run from Pune division for Ashadi Wari)
पुणे विभागातून ६ ते १४ जुलै या कालावधीत ५३० बसेस सोडण्यात येणार आहेत. लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गही अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.– ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे