मोबाईलवर आलेल्या ‘एसएमएस’मुळे तुमचे बँक खाते होईल रिकामे
मुंबई : वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’पाठवून (Fake ‘SMS‘) वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क (Contact on mobile number) साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक (Link) पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड (Software download) करण्यास सांगणे व याप्रकारे वीजग्राहकाने (Consumer) प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक (Financial fraud) करण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून (Contact on mobile number) प्राप्त झालेल्या बनावट ‘एसएमएस’ना (Fake ‘SMS’) कोणताही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून (MSEDCL) करण्यात आले आहे. (The ‘SMS’ received on the mobile will empty your bank account)
मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून लुबाडण्याचे प्रकार घडत आहे. नुकतेच काही शहरात बनावट ‘एसएमएस पाठवून ऑनलाईनद्वारे लुबाडल्याचा प्रकार घडत आहे. यासोबतच महावितरणकडून देखील बनावट ‘एसएमएस’प्रकरणी सायबर सेलमध्ये याआधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. (The ‘SMS’ received on the mobile will empty your bank account)
Related Posts
मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट ‘एसएमएस’ नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्स अॅप मेसेज पाठविण्यात येत नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (The ‘SMS’ received on the mobile will empty your bank account)
महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’(MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही. (The ‘SMS’ received on the mobile will empty your bank account)