नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप मोहिमेला यश

नांदेड : पीक कर्जाच्या (Crop loan) माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक सहाय्य करता यावे यादृष्टिने जिल्हा प्रशासन (District Administration) आणि बँकांच्या (The bank) समन्वयातून संपूर्ण जिल्हाभर आयोजित केलेल्या एक दिवसीय शिबिरास उत्स्फूर्त यश मिळाले. (Success of crop loan distribution campaign in Nanded district)

Zilla Parishad, Panchayat Samiti elections : जिल्हा परिषद गट आणि गणाचे आराखडे तालुक्यावर मिळतील पाहायला

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी स्वत: अर्धापूर तालुक्यातील लिंबगाव, मालेगाव व अर्धापूर येथील शिबिरांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पात्र शेतकऱ्यांनी बँकांमध्ये जाऊन पीक कर्जाचे नूतनीकरण करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या हस्ते आज कर्ज मंजुरी पत्राचे शेतकरी व बचतगटांना वाटप करण्यात आले. (Success of crop loan distribution campaign in Nanded district)

परदेशातील शिक्षणासाठी राज्य शासन देतोय पाठबळ, काय आहे योजना जाणून घ्या

प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना व बचतगटांना कर्ज मिळावे यादृष्टीने मागील आठवड्यात जिल्हा प्रशासन व बँक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एक दिवसीय शिबीर घेण्याचे निर्देश दिले होते. प्रत्येक तालुक्यातील संबंधित बँका, तहसिल कार्यालय, तलाठी, गटविकास अधिकारी आणि त्या-त्या गावातील शासनाच्या प्रतिनिधींनी संपूर्ण जिल्हाभरात आज 84 ठिकाणी हे शिबीर आयोजित करून शेतकऱ्यांना व बचगटांना पात्रते प्रमाणे पीक कर्ज दिले.

लिड बँक मॅनेजर (Lead Bank Manager) अनिल गचके यांनी जिल्ह्यातील 23 बँकांच्या समन्वयातून संपूर्ण बँक अधिकाऱ्यांना विश्वास दिला. आजच्या शिबिरात या बँकेच्या अधिकाऱ्यांनीही सकारात्मक दृष्टीकोन घेत ही मोहिम यशस्वी करून दाखविली. येत्या 15 दिवसात जास्तीत जास्त पीक कर्जाचे नूतनीकरण करण्याचा निर्धार बँकांतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. (Success of crop loan distribution campaign in Nanded district)

Local ad 1