राज्यातील महापालिका निवडणुकांची आज आरक्षण सोडत

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवायच होत असून, महापालिका निवडणुकांचे (Municipal Corporation Election 2022) बिगुल वाजले आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील 14 महापालिकांची (Municipal Corporation) आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.  यात मुंबईसह पुणे आणि इतर महापालिकांचा समाावेश आहे. (Municipal Corporation Election Reservation 2022)

 

देशात सगळ्यात कठीण असलेली UPSC परीक्षा महाराष्ट्रातील 60 जण पास

मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), कल्याण डोंबिवली, पुणे (Pune), नागपूर (Nagpur) आणि कोल्हापूरच्या (Kolhapur) सोडतीकडे विशेष लक्ष असणार आहे. अशातच इच्छुक उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे.  (Municipal Corporation Election Reservation 2022)

परदेशातील शिक्षणासाठी राज्य शासन देतोय पाठबळ, काय आहे योजना जाणून घ्या

 

मुंबईसह 14 महापालिकांच्या प्रभागांचे आरक्षण सोडत आज ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) होणार आहे. नगरसेवक होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा दिवस आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवलीसह 14 महापालिकांचा समावेश आहे. या सोडतीवर सर्व पक्षांतील इच्छुक, संभाव्य उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. (Municipal Corporation Election Reservation 2022)

 

 

  • राज्यातील 14 महापालिकांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मुंबईसह (Mumbai) राज्यातील नवी मुंबई (Navi Mumbai), वसई विरार (Vasai Virar), उल्हासनगर (Ulhasnagar), कोल्हापूर (Kolhapur), अकोला (Akola), अमरावती (Amravati), नागपूर (Nagpur), सोलापूर (Solapur), नाशिक (Nashik), पुणे (Pune), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad), कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) आणि ठाणे (Thane) या महापालिकांची मुदत संपली आहे.
Local ad 1