पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, नागरिक बिनधास्त झाले आहेत. मात्र, त्यातच आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची भर पडली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात प्रथमच बी ए. 4 आणि 5 व्हेरियंट आढळले आहे (Introduction of new variant of Corona in Maharashtra)
पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू असलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरात बी.ए. 4 व्हेरियंटचे 4 तर बी.ए. 5 व्हेरियंटचे 3 रुग्ण आढळून आले आहे. (Introduction of new variant of Corona in Maharashtra)
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे व्हेरियंट आढळले असून, इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर (आय बी डी सी) फरिदाबाद या संस्थेने याची पुष्टी केली आहे.
7 रुग्णांची थोडक्यात माहिती
सर्व रुग्ण पुणे शहरातील असून, 4 ते 18 मे या कालावधीतील आहेत. यातील 4 पुरुष तर 3 महिला आहेत. यातील 4 जण 50 वर्षांवरील आहेत तर 2 जण 20 ते 40 वर्षे या वयोगटातील आहेत तर एकजण 10 वर्षांखालील आहे. (Introduction of new variant of Corona in Maharashtra)
दोन रुग्णांचा दक्षिण आफ्रिका, बेल्जियम प्रवासाचा इतिहास आहे तर तर 3 जणांनी भारतात केरळ आणि कर्नाटक राज्यात प्रवास केला आहे. दोन रुग्णांचा कोणताही प्रवासाचा इतिहास नाही. (Introduction of new variant of Corona in Maharashtra)
यातील 9 वर्षाचा एक मुलगा वगळता सर्वांनी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तर एकाने बूस्टर देखील घेतलेला आहे. यातील सर्वांना कोविडची सौम्य लक्षणे होती. कोणालाही रुग्णालयात भरती करण्याची गरज भासलेली नाही. प्रत्येकाला घरगुती विलगीकरणात उपचार देण्यात आले. आता हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. बी. ए. 4 आणि 5 हे ओमायक्रॉन वंशावळीतील असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग काहीसा वाढतो असे आंतरराष्ट्रीय अनुभवावरून लक्षात आले आहे.