नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 75 ठिकाणी पीक कर्ज वाटप शिबिर, तब्बल 500 कोटींचे कर्ज होणार वाटप

नांदेड : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बँकांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जाईल. यात पीक कर्जाचे (Crop loan)  400 कोटी तर बचतगटांसाठी 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटप होईल, अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी व्यक्त केला. (Crop loan distribution camps at 75 places in the district)

 

भामट्यांचा भांडाफोड : नोकरी आदेश पत्राच्या भाषेवरून ‘बोगस’ भरती चव्हाट्यावर

 

जिल्ह्यातील दुर्गम भागातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने अनेक चांगल्या योजना हाती घेतल्या आहेत. या योजनांचा लाभ त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी ग्राम पातळीवर बँकिंग क्षेत्राशी निगडीत आवश्यक ती प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यासाठी गाव तेथे बँकींग प्रतिनिधी सहज उपलब्ध झाला पाहिजे. आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील 23 बँकांच्या माध्यमातून येत्या 1 जून रोजी जिल्ह्यात 75 ठिकाणी पीक कर्ज वाटप शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.  (Crop loan distribution camps at 75 places in the district)

पुण्यात ATS ने एका दशहतवाद्याला केली अटक

 

जिल्हास्तरीय बँकिंग समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या बैठक कक्षात संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके, गणेश पठारे व संबंधित बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  (Crop loan distribution camps at 75 places in the district)

 

वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी ‘दामिनी’ अॅप वापरा

गावनिहाय यादी होणार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 400 कोटी रुपयांचे तर स्वयंसहाय्यता बचत गटातील जिल्ह्यातील बचतगटांना 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटप 1 जून रोजी शिबिरात करण्याचे नियोजन तथा उद्दीष्ट ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. यादृष्टीने प्रत्येक बँकांनी आपल्याकडे वर्ग असलेल्या लाभार्थी व गावनिहाय यादीनुसार योग्य ती पूर्व तयारी करण्याचे निर्देश त्यांनी बँकांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले.  (Crop loan distribution camps at 75 places in the district)

 

महापालिकेची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर, इच्छुकांची धाकधूक वाढली

 बचतगटांनाही कर्ज वाटप होणार

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात काम करणारे 900 च्या जवळपास बँकिंग प्रतिनिधी आहेत. यात प्रत्येक गावातील महिला बचत गटात काम करणार्‍या पात्र महिलांचा समावेश झाला तर त्याही चांगले काम करून दाखवतील. नॅशनल रूरल लाईव्हली हूड मिशन अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचतगटांचे हे उद्दिष्ट निर्धारीत केले आहे. यात केंद्र आणि राज्य शासनाचा निधी अंर्तभूत आहे. महिला बचतगटांना स्वयंरोजगारांची संधी त्यांच्या गावातच आता उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Local ad 1