महापालिकेची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर, इच्छुकांची धाकधूक वाढली
मुंबई : राज्यातील 14 महापालिका सुमारे 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर प्रशासकीय पातळीवर जोरदार काम सुरु आहे. पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) घेण्याची अनुमती द्या, अशी विनंती न्यायालयात केली होती.न्यायालयाने ज्या ठिकाणी पाऊस नसतो, त्या ठिकाणच्या निवडणुका घ्यायला काय हरकत आहे, असे न्यायालयाने निवडणुक आयोगाला विचारले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर काम सुरु आहे. (Municipal Corporation announces reservation draw program)
राज्यातील ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, राज्य सरकारने दिले स्पष्टीकरण
भामट्यांचा भांडाफोड : नोकरी आदेश पत्राच्या भाषेवरून ‘बोगस’ भरती चव्हाट्यावर
या महापालिकांच्या निवडणुका होणार
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. (Municipal Corporation announces reservation draw program)
असा असेल सोडतीचा कार्यक्रम
- २७ मे – सोडत काढण्यासाठी प्रसार माध्यमांद्वारे नागरिकांना माहिती देणे
- ३१ मे – अनुसूचित जाती, जमाती, व सर्वसाधारण महिला यांच्या आरक्षित जागा निश्चीत काढण्यासाठी सोडत काढणे
- १ जून – सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे
- १ जून ते ६ जून – प्रभागनिहाय आरक्षणावर हरकती व सूचना मागविणे
- १३ जून – प्रभाग निहाय हरकती व सूचनांवर विचार करून अंतिम आरक्षण परिशिष्ट – ड मधील नमुन्यात राजपत्रात सादर करणे.