केंद्राकडून पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात, आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
मुंबई : इंधनाचे दर गगनाला भिडले त्याचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेलच्या कपात (Petrol Diesel Price) केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल (Petrol Price) 9.50 रुपयांनी आणि डिझेल (Diesel Price) 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त केलं आहे. सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आपले शुल्क कमी करेल याकडे लक्ष लागले आहे. (Reduction in petrol and diesel prices from the Center, now look at the decision of the state government)
केंद्र सरकाच्या मोठ्या निर्णयानंतर केरळ सरकारनंही पेट्रोल-डिझेलवरली स्टेट टॅक्स मध्ये घट केली आहे. केरळ सरकारनं पेट्रोलच्या दरांत 2.41 रुपये आणि डिझेलच्या दरांत 1.36 रुपयांची घट केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी उत्पादन शुल्क कमी करण्याचा सल्ला दिला होता. आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. (Reduction in petrol and diesel prices from the Center, now look at the decision of the state government)
पुणे शहरात इंधनाचे दर
Petrol Rs 110.87 ( reduced)
Power Rs 115.63 (reduced )
Diesel Rs 95.36 (reduced)