जिल्हा परिषदेत समुपदेशाने 29 बदल्या, उद्या कोणत्या विभागाच्या होणार बदल्या जाणून घ्या…
नांदेड : नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रिया समुपदेशनाव्दारे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवसी शुक्रवारी (दि.20) विविध संवर्गातील 29 कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात बांधकाम विभागातील 16 बदल्या, ग्रामीण पाणी पुरवठा विभागात 2 तर महिला व बालकल्याण विभागातील 11 बदल्यांचा समावेश आहे. (29 transfers in Zilla Parishad by counseling)
बदली प्रक्रियेत यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे (Zilla Parishad Chief Executive Officer and Administrator Varsha Thakur-Ghuge), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले (Additional Chief Executive Officer Dr. Sanjay Tubakale) , सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, सागर तायडे, अशोक भोजराज, ए. आर. चितळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती. (29 transfers in Zilla Parishad by counseling)
उद्या होणाय या विभागाच्या बदल्या
जिल्हयातील सर्व तालुक्यात असणा-या जागांच्या समानिकरणानुसार पारदर्शक बदल्या करण्यात येत आहेत. शनिवारी (दि.21) कृषी विभागातील कर्मचा-यांच्या सकाळी 10 ते 12 या वेळेत तर सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्या दुपारी 12 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत चालू राहणार आहे.