नांदेड जिल्ह्यातील किती जिल्हा परिषद गट आरक्षित होणार ?
नांदेड : नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या (Population of Nanded district) 24 लाख 16 हजार 184 असून, त्यात अनुसूचित जातीचे (Scheduled Castes) 4 लाख 77 हजार 23 तर अनुसूचित जमातीचे (Scheduled Tribes) दोन लाख 40 हजार 274 नागरिक आहेत. ही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण असणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी किती गट आणि गण आरक्षित होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. (How many Zilla Parishad groups will be reserved in Nanded district?)
राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण (Zilla Parishad Group and Panchayat Samiti Group) यांच्या प्रारूप रचनेपासून ते अंतिम रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सध्या प्रारूप रचनेवर काम सुरु असून, दुसरीकडे आरक्षण निश्चित न झाल्याने इच्छुक तळ्या-मळ्यात आहेत. तर काही इच्छुक मी किंवा सौ या पैकी एकासाठी आरक्षण निघेल, या अपेक्षेने गाठी-भेटी सुरु केल्या आहेत. (How many Zilla Parishad groups will be reserved in Nanded district?)
आरक्षण निश्चितीचे सूत्र
जिल्ह्यातील एकूण ग्रामीण लोकसंख्येने असलेल्या ग्रामीण क्षेत्रातील एकूण गुणोत्तराला एकूण गट संख्येने गुणले जाईल. त्यानंतर येणारा आकडा त्या प्रवर्गासाठी आरक्षित गटांचा असेल. या सूत्राप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 14.41 म्हणजेच १४ तर अनुसूचित जमातीसाठी 7.28 म्हणजेच ७ जागा निश्चत होण्याची शक्यता आहे. (How many Zilla Parishad groups will be reserved in Nanded district?)
महिलांसाठी 50 टक्के जागा
नांदेड जिल्ह्यात नवीन गट रचनेनुसार 73 गट तयार झाले आहेत. पैकी अनुसूचित जातीसाठी 14 आणि अनुसूचित जमातीसाठी 7 असे एकूण 21 गट आरक्षित होणार आहेत. याशिवाय महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने एकूण सर्व गटांमध्ये 37 गट महिलांसाठी आरक्षित असतील. (How many Zilla Parishad groups will be reserved in Nanded district?)