LPG Price Hike। घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरांत पुन्हा वाढ
नवी दिल्ली : देशभरात महागाईने (Inflation) सर्वसामान्य माणूस बेजार झाले आहेत. आज पुन्हा एकदा घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरांत वाढ (LPG Price Hike) झाली आहे. नव्या दरांनुसार, आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती एक हजार पार पोहोचल्या आहेत. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. तर, व्यावसायिक गॅस सिलेंडर (Gas Cylinder Rate) 8 रुपयांनी महागला आहे. (Rise in domestic LPG cylinder rates)
Related Posts
घरगुती सिलेंडरच्या दरांत केवळ 12 दिवसांत झालेली ही दुसऱ्यांदा दरवाढ (LPG Price Hike) आहे. यापूर्वी 7 मे 2022 रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. त्यावेळी एलपीजीच्या दरांमध्ये 50 रुपये प्रति सिलेंडर वाढ करण्यात आली होती. त्यासोबतच मे महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत दोनदा वाढ करण्यात आली आहे. (Rise in domestic LPG cylinder rates)