...

नांदेड जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची समुपदेशन पध्दतीने होणार बदली प्रक्रिया

नांदेड : जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्यांची वेळ आणि दिनांक निश्चित झाली आहे. दि. २० ते २६ मे दरम्यान जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे समुपदेशन पध्दतीने बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (Transfer process of Nanded Zilla Parishad staff through counseling system)

 

 

 

जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी काढलेल्या आदेशाने कर्मचाऱ्यांतील संभ्रम दुर झाला असून, समुपदेशन बदली प्रक्रियेला सुरवात करण्यात येणार आहे. ही बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात येणार आहे. (Transfer process of Nanded Zilla Parishad staff through counseling system)

विभागनिहाय वेळापत्रक

समुपदेशन बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २० मे रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या समक्ष सकाळी १० ते १२ वेळेत बांधकाम विभाग, दुपारी १२ ते एक लघुपाटबंधारे विभाग, दुपारी एक ते तीन या वेळेत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व त्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत महिला बालकल्याण विभागाच्या सार्वत्रिक बदली प्रक्रिया चालणार आहे.

 

बदली प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी २१ मे रोजी कृषि विभाग, सामान्य प्रशासन विभागांची बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. २३ मे रोजी आरोग्य विभागातील बदली पात्र कर्मचाऱ्यांसाठीची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. २४ मे रोजी शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्या वगळता अन्य पदांसाठीच्या बदल्या करण्यात येणार आहेत. २५ मे रोजी ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बदली प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी पशुसंवर्धन विभाग, वित्त विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची समुपदेशन पध्दतीने बदली प्रक्रिया पार पडणार आहे. (Transfer process of Nanded Zilla Parishad staff through counseling system)

Local ad 1