...

अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला (Actress Ketki)  नवी मुंबई येथील कळंबोली पोलिसांनी कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 16 येथील घरातून तिला ताब्यात घेतलं आहे. (Actress Ketki Chitale arrested by police)

 

अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awhad) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमधून केतकी चितळेला अटक केल्याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई
पोलिसांचे अभिनंदन केले आहे. (Actress Ketki Chitale arrested by police)

Local ad 1