राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविणार : संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा  

पुणे : राज्यसभेची निवडणूक आपण अपक्ष म्हणूनच लढविणार (Independent will contest Rajya Sabha elections) असल्याचे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. तसेच स्वराज्य (Swarajya) या नावाने संघटना स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केले.

 

 

पुण्यात गुरुवारी पत्रकार घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘स्वराज्य’ नावाने संघटना चालवली जाणार असून, या संघटनेचा प्रसार करण्यासाठी लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहे, असे त्यांनी सांगितले. (Independent will contest Rajya Sabha elections)

मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मात्र, जनसेवा करायची असल्यास राजसत्ता हवी. यासाठी मी दोन निर्णय घेतले आहेत. पहिला निर्णय मी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सहा जागा रिक्त होत असून, त्यात भाजप 3  महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाकडे एक जागा आहे. सहावी सीट येथे संख्याबळावर एक सदस्य निवडून येऊ शकतो. महाविकास आघाडी कडे 27 तर भाजप कडे 22 मते आहेत. ही निवडणूक मी अपक्ष लढवणार आहे. 29 अपक्ष आमदार आहेत त्यांनी सहकार्य करावे, यासाठी सर्वाना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.(Independent will contest Rajya Sabha elections)
Local ad 1