Municipal Council General Election – 2022 : प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप, हरकती,  14 मे पर्यत सादर करा

नांदेड : जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव (Kandhar, Mukhed, Deglur, Biloli, Kundalwadi, Dharmabad, Umri, Bhokar, Mudkhed and Hadgaon) नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप / हरकती / सूचना असल्यास त्यांनी कारणासह संबंधित नगरपरिषदांच्या मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात 10 ते 14 मे 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत लेखी सादर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी केले आहे. ( Municipal Council General Election – 2022)

 

 

 

राज्य निवडणूक आयोगाच्या 6 मे 2022 रोजीच्या पत्रान्वये माहे मे 2020 ते मार्च 2022 मध्ये मुदत संपलेल्या नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारीत प्रभाग रचना कार्यक्रम-2022 जाहीर केला आहे. (Municipal Council General Election – 2022)

या कार्यक्रमानुसार नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली संबंधित नगरपरिषदेची प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे (महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 10 नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी संबंधित नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. (Municipal Council General Election – 2022)

राज्य निवडणूक आयोगाच्या 6 मे 2022 रोजीच्या पत्रान्वये माहे मे 2020 ते मार्च 2022 मध्ये मुदत संपलेल्या नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारीत प्रभाग रचना कार्यक्रम-2022 जाहीर केला आहे.

 

शनिवार 14 मे रोजी दुपारी 3 वाजेनंतर आलेले आक्षेप / हरकती / सूचना विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. ( Municipal Council General Election – 2022)

Local ad 1