पुणे : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका (General election) वेळेत न झाल्याने सध्या त्याठिकाणी प्रशासक राज आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाही (State Election Commission) अलर्टमोडवर आले आहे. (Big developments regarding Zilla Parishad and Panchayat Samiti elections)
प्रारुप प्रभाग रचना (Draft division composition) जाहीर करण्यासंदर्भात आयोगाने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनला (District Administration) सूचना दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या दि.०४/०५/२०२२ रोजीच्या निर्णयात नमूद केले आहे की, दि.११/०३/२०२२ रोजीच्या अधिनियमातील सुधारणा अस्तित्वात येण्यापूर्वी दि. १०/०३/२०२२ रोजी असलेली प्रभाग रचनेची कार्यवाही ज्या टप्प्यावर होती तेथपासून पुढे आयोगाने कार्यवाही चालू ठेवावी, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार कामकाज निश्चित करण्यात आले आहे. (Big developments regarding Zilla Parishad and Panchayat Samiti elections)
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचे कामकाज खालील नमूद कार्यवाही करण्यात आले आहे. त्यात नकाशे गुगल नकाशावर सुपर इंपोज करणे आणि जनगणनेची आकडेवारी लिंक करा, असे आदेश दिले आहेत. (Big developments regarding Zilla Parishad and Panchayat Samiti elections)
- आपल्या कार्यालयातील प्रभाग रचनेचे कामकाज हाताळणारे एक अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे तसेच जनगणनेची आकडेवारी, निवडणूक विभाग/ निर्वाचक गणाची गावनिहाय आकडेवारी आणि नकाशे (सॉफ्ट कॉपीसह) सोबत जोडलेल्या तक्त्यामधील नमूद दिनांकास कार्यालयीन वेळेत आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सुचना संबंधिताना द्याव्यात, असे आदेश दिले आहेत. (Big developments regarding Zilla Parishad and Panchayat Samiti elections)