नांदेड जिल्ह्यात किती असणार जिल्हा परिषद गट, जाणून घ्या..

नांदेड : ओबीसी आरक्षणामुळे (OBC reservation) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुका (Five year election of Zilla Parishad and Panchayat Samiti) लांबणीवर पडल्या आहेत. आता राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद गट निश्चित केले आहे. नांदेड जिल्ह्यात 10 गटांची संख्या वाढली असून, 73 गट असणार आहेत. (Find out how many Zilla Parishad groups in Nanded district)

 

 

 

राज्याच्या ग्राम विकास विभागाने (State Rural Development Department) जिल्हा परिषद गटांची संख्या निश्‍चित केली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक 73 जिल्हा परिषद गट नांदेड जिल्ह्यात आहे. (Find out how many Zilla Parishad groups in Nanded district)

 

 

ग्रामीण विकास विभागाने जिल्हा परिषद गटांची संख्या निश्चित करण्यासंदर्भातील अध्यादेश जारी केला. प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी त्या जिल्ह्यामध्ये किती गट असतील यांची संख्या जाहीर केली आहे. एका जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समित्यांचे दोन गण आहेत. राज्य शासनाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर जास्तीत जास्त 75 गटांची संख्या आता 85 पर्यंत गेली आहे, तर कमीतकमी पन्नास गट असणार्‍या जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आता 57 झाली आहे. गटरचनेचे संपूर्ण अधिकार राज्य शासनाला प्राप्त झाल्याने ही अधिसूचना करण्यात आली आहे. (Find out how many Zilla Parishad groups in Nanded district)

 

 

 

Local ad 1