Ajit Pawar । कोणत्या आमदारांना मिळणार घर, आणि तो कसे, उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
IPL season । आयपीएलचा थरार आजपासून रंगणार
अजिर पवार पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक (Pune Rural Superintendent) कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकराने आमदारांचा निधी ५ कोटी रुपये केला (MLAs funded Rs 5 crore) आहे. तो त्यांना घरी नेण्यासाठी दिलेला नाही. आमदारांच्या मतदारसंघात कराव्या लागणाऱ्या कामासाठी दिलेला आहे. मात्र, त्यावरुनही काहीजण टिका करत सुटले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आमदारांना घर देण्याची घोषणा केली. त्यानंतर माध्यमांतून जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, मुंबईत लोकप्रतिनिधींना घर फुकटात मिळणार नाही. जनतेच्या कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या गरीब आणि गरजू लोक प्रतिनिधींना हे घर मिळणार आहेत. ज्यांच्या नावावर घर आहेत. त्यांनाही मिळणार नाही, पवार यांनी असे स्पष्ट केले. (MLAs will not get free house – Ajit Pawar)