...

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये

नांदेड : कोविड-19  (Covid-19) आजाराने एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास विभागाने केले आहे. (Children who lose their parents due to corona will get 10 thousand rupees)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महिला व बाल विकास विभागाला बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तालुका स्तरावर गरजु लाभार्थ्यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तर नांदेड मनपा क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांनी संरक्षण अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय शास्त्रीनगर नांदेड येथून अर्जाचा नमुना घेवून आवश्यक कागदपत्रांसह मुळ अर्जासह प्रस्ताव सादर करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Children who lose their parents due to corona will get 10 thousand rupees)
मुळ अर्ज, बालकाचे शाळेचे बोनाफाईड, आई-वडील कोविड -19 ने मुत्यृ झाल्याचा दाखला व झेरॉक्स प्रत, बालकाचे अथवा बालकांच्या पालकांचे संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते आधार संलग्न असल्याबाबत पासबुक झेरॉक्स प्रत, बालकाचे आधार कार्ड, शासनाच्या किंवा इतर योजनाचा लाभ घेत नसल्याचे हमीपत्र असे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शास्त्रीनगर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. अब्दुल रशीद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.  (Children who lose their parents due to corona will get 10 thousand rupees)
Local ad 1