(Pay income tax arrears) मिळकत कर थकबाकी भरा, अन्यथा जप्तीची कारवाई
पुणे : पुणे कँटोन्मेंट बोर्डाने सुमारे अडीचशे मिळकत कर थकबाकीदारांना नोटीसा बजावल्या आहेत. मिळकत कराची थकबाकी तातडीने भरा, अन्यथा जप्तीची कारवाई करण्याचा इशारा या नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. (Pay income tax arrears, otherwise confiscation action)
लष्कर परिसरात १२ हजार २०० मिळकती असून, त्यांच्याकडून दरवर्षी मिळकत कर घेतला जातो. या करापोटी पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडे (cantonment board pune) ३८ ते ४० कोटी रुपये जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या वर्षभरात बोर्डाला मिळकत कर संकलनातून अवघे १८ कोटी रुपये मिळाले आहेत. थकबाकीदारांच्या यादीमध्ये लष्कर परिसरातील हॉटेल चालक, कापड व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आणि अन्य व्यावसायिकांचाही समावेश आहे. (Pay income tax arrears, otherwise confiscation action)
वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) वाटा आणि सर्व्हिस चार्जेस मिळत नसल्याने बोर्ड प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मिळकत कर, वाहन प्रवेश शुल्क, होर्डिंग शुल्क, पे अँड पार्क अशा मोजक्याच महसूल स्रोतातून मिळणाऱ्या उत्पन्नावर बोर्डाला कारभाराचा गाडा हाकावा लागत आहे. मात्र, गेल्या वर्षभरात करोना संकट आणि लॉकडाउनमुळे या उत्पन्नावरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे बोर्डाने मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यास गती दिली आहे. (Pay income tax arrears, otherwise confiscation action)
मिळकत कर थकबाकीदारांना कराची थकबाकी भरण्याच्या वारंवार सूचना केल्या आहेत. त्यानंतर या नोटीसा पाठविण्यात आल्या असून, कर भरणा न केल्यास मिळकत जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा बोर्ड प्रशासनाने दिला आहे. (Pay income tax arrears, otherwise confiscation action)