नांदेड जिल्ह्यात 96 व्यक्ती आढळले कोरोना बाधित
जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 686 एवढी झाली असून यातील 99 हजार 177 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 824 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Nanded district, 96 persons were found infected with corona)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे हिमायतनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा 8 फेब्रुवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 685 एवढी आहे.